HW News Marathi
राजकारण

सरकारने अण्णांच्या जीवाशी खेळू नये | उद्धव ठाकरे

मुंबई | सरकारने ज्येष्ठ समाजसेवक अण्णांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या उपोषणाला शुभेच्छा देणे, हा प्रकार संतापदायक असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. “अण्णांचा लढा भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आहे. जिथे शक्य आहे तिथे शिवसेना अण्णा हजारेंना सोबत करेल” असेही उद्धव ठाकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी या आपल्या गावी ३० जानेवारीपासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली असून आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणामुळे अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली असून त्यांच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. असे असताना पंतप्रधान मोदींनी अण्णांच्या उपोषणाला शुभेच्छा देणारे पत्र पाठविल्याने उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस छत्तीसगढमधील नक्षली कारवायांचे समर्थन करते | मोदी

News Desk

आता राम मंदिरचे कार्य पूर्ण होणार, मोहन भागवत यांचा विश्वास

News Desk

#RamMandir :अवघ्या २४ तासात उद्धव ठाकरे मुंबईला रिटर्न

News Desk