HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

मुंबई | एक पक्ष, एक नेता आणि एक मेळावा अशी ओळख असलेल्या शिवसेनेचं चित्र आता बदलताना पाहायला मिळतंय. ते म्हणजे दोन नेते आणि दोन मेळावे असं चित्र यंदा दिसतंय. खरंतर खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचं? हा प्रश्न आजही कायम आहे. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. मात्र, याबाबतच्या याचिकांचं स्वरूप हे गुंतागुंतीचं आहे. विशेष म्हणजे या केसचा निकाल हा भविष्यात यासारख्या प्रकरणांसाठी संदर्भ म्हणून दिला जाईल. त्यामुळे हे प्रकरण बरंच लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, असं असलं तरी तोपर्यंत दोन्ही बाजूंना आपणच खरी शिवसेना असल्याचे दाखले देण्यास पुरेसा वेळ सुद्धा मिळतो आहे. त्यातच दसरा मेळाव्याची संधी चालून आलीये.

दसरा मेळावा घेण्यावरून सुरू झालेला वाद आपण सर्वांनीच पाहिला आहे. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थ म्हणजेच दादरमधल्या शिवाजी पार्कवर होतो. पण पक्षावरच दावा करणाऱ्या शिंदे गटाने या मेळाव्यावरही हक्क बजावला आणि त्यासाठी त्यांनी शिवाजी पार्कची मागणी देखील केली. यातून ‘आम्हीच खरे शिवसैनिक असून आम्हीच शिवाजी पार्कात मेळावा घेतला’ असा संदेश देण्यामागे शिंदे गटाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यापूर्वीच मुंबई महापालिकडे मैदानासाठी अर्ज केला होता. असं असलं तरी दोन्ही गटाचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगत महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली. दरम्यानच्या काळात शिंदे गटाने दुसरा पर्याय म्हणून BKC मैदान बूक करून घेतला. यानंतर ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यात न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने कौल दिला.

दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर आज दोन्ही गटाचे मेळावे होत आहेत. मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये टीजरद्वारे व्हिडिओ वॉर पाहायला मिळाला. तर कुणाच्या मेळाव्याला अधिक गर्दी जमली? कुणाचा मेळावा अधिक भव्य होता? अशी स्पर्धा आता सुरू झाली आहे. शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांना सुद्धा आपापल्या मतदार संघातील लोकांना मेळाव्याला आणण्यासाठी टार्गेट देण्यात आलं होतं. त्यामुळे शिंदे गटातील नेते हजारो लोकांना सोबत घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या दोन्ही मेळाव्यांमध्ये आता कुठल्या मुद्यांवर कोण कोणावर निशाणा साधणार? त्याला प्रत्युत्तर कसं मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation : जाणून घ्या… मराठा समाजाला आरक्षणाद्वारे कोणते लाभ मिळणार

News Desk

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

News Desk

मुख्यमंत्री आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर जाणार

News Desk