HW News Marathi
देश / विदेश मुंबई राजकारण

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

मुंबई | आयकर विभागाने बीबीसीच्या (BBC) दिल्ली कार्यालयावर छापे टाकले आहे. दिल्लीपाठोपाठ आयकर विभागाने बीबीच्या मुंबई कार्यालयावर सुद्धा छापेमारी केली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) बीबीसीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केल्याची माहिती प्रसार माध्यमातून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत्त संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर आधारीत माहितीपट प्रदर्शित केला होता.

पंतप्रधान मोदींच्या बीबीसीने केलेल्या माहितीपटमुळे देशाची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आली आहे. यामुळे बीबीसीच्या माहितीपटाचा देशभरात विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईच्या कार्यलयावर कारवाई केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींवरील माहितीपट यूट्यूब आणि ट्वीटरवर बंदी घालण्यात आली असून या माहितीपटावर बंदी घातली असताना सुद्धा दिल्लीच्या जेएनयू आणि अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी माहितीपट दाखविण्याचे आयोजन करण्याचे प्रयत्न केले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हल्ला बोल यात्रा’ नसून ‘डल्ला मार यात्रा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

राज्यातील साडेबारा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी विरोधीपक्ष नेता म्हणून अजितदादा पवार काम करतील! – जयंत पाटील

Aprna

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, सामनातून टीका  

News Desk