HW News Marathi
राजकारण

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी सरकार देशातील गरीबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. लोकांच्या भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले तरी देशात पेट्रोलचे दर महाग आहेत.

हा पैसा थेट श्रीमंतांच्या खिशात जात आहे. देशातील श्रीमंतांसाठी सरकार काम करत आहे, त्यांची कर्जे माफ केली जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीतंर्गत आणावेत अशी आमची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून दुर्लक्ष करत होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी आज चंद्रपुरात दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘अमित शहा त्यांचे नाव कधी बदलणार ?’

Gauri Tilekar

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

News Desk
महाराष्ट्र

अग्निशमन दलाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन  

News Desk

पुणे | रमजानचा महिना हा इस्लाम धर्मासाठी पवित्र समजला जातो. याच महिन्यात सर्व मुस्लिम समाज महिनाभर रोजा पाळतात. दिवसभर रोजा ठेवत सायंकाळी नमाजच्या वेळी अन्न पाणी ग्रहण करुन रोजा सोडतात. या महिन्यात समाजातील विविध जाती-धर्मातले लोक एकत्र येत बंधुत्वाचे प्रेमाचे नाते दृढ करण्यासाठी मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.

पुण्याच्या अग्निशमन दलमध्ये असाच इफ्तारचा कार्यक्रम मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने अग्निशमन दलाचे जवान एकत्र येतात व खेळीमेळीचे उत्साही वातावरण राहते. यावेळी दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे तसेच विभागीय अधिकारी सुनिल गिलबिले, सहायक अधिकारी दत्तात्रय नागलकर, केंद्र अधिकारी सुभाष भिलारे व तांडेल राजाराम केदारी आदी उपस्थित होते.

यावेळी जवान शौकत शेख म्हणाले, “अशाप्रकारे एकत्र येत आमचे काम करण्याचे मनोबल उंचावते. अशा ठिकाणी जवान म्हणून काम करताना सर्व धर्म समभाव हेच ह्दयात भिनलेले असते. आग आपत्ती वेळी अडकलेले लोक कोण अथवा घर कोणाचे हा विचार ही मनाला स्पर्श करीत नाही. जिवित व मालमत्तेचे रक्षण हेच एक ध्येय समोर असते असेही ते यावेळी म्हणाले.

Related posts

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे काल पुणे येथे आगमन  

Aprna

“१० दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि…”,जळगावच्या विजयाचा खडसेंनी सांगितला फॉर्म्युला⁩

News Desk

गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आता ऑनलाइन घेता येणार

News Desk