HW News Marathi
राजकारण

हैद्राबादचे नाव बदलले तर सिंगजींना महागात पडेल | रेणुका चौधरी

नवी दिल्ली । “डायलॉगबाजी केल्यान जनतेची मतं मिळतील,असे वाटतंय. हैदराबादी असल्याचं आम्ही गर्वानं सांगतो. हे कोण आहेत नामांतर करणारे. स्वतःचं नाव बदला. शहराचं नाव, आमची ओळख, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करतील ना तर सिंगजींना महाग पडेल”, अशा शब्दांत काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी राजा सिंग यांना इशारा दिला आहे.

शहरांच्या नावात बदल करण्याच्या मुद्यावरुन भाजपा आणि विरोधक यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. ‘तेलंगणामध्ये भाजपा सत्तेत आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तींची नावं देण्यात येतील’, असे विधान भाजपा नेते राजा सिंग यांनी केले. यावरुन,’हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करतील ना तर सिंगजींना महाग पडेल’, असा इशारा राजा सिंग यांना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी दिला आहे.

राजा सिंग यांचे आश्वासन

”तेलंगणामध्ये भाजपा सत्तेत आली तर आम्ही सर्वप्रथम विकासाला प्राधान्य देऊ आणि दुसरे शहरांचे नामांतर करण्यात येईल. शहरांना थोर व्यक्तींची नावं असली पाहिजेत. ज्यांनी देशासाठी व समाजासाठी लढा दिलाय, अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत”,असे विधान राजा सिंग यांनी केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk

आम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा ! 

News Desk