May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 :भाजपच्या पहिल्या यादीत मोदी, गडकरींसह सुजय विखे-पाटील यांना स्थान मिळणार ?

नवी दिल्ली | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजप लोकसभा  उमेदवारांची पहिली यादी आज (१६ मार्च) जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक आज दुपारी चार वाजता पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. युतीमध्ये भाजप २५ जागा लढविणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, सुभाष भामरे यांच्यासह विद्यमान खासदारांनाही  स्थान दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.

बीडच्या खासदार प्रितम मुंडे, नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावीत यांची उमेदवारीही निश्‍चित मानली जात आहे. भाजपमध्ये प्रवेश घेतलेले सुजय विखे- पाटील यांचीही उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर होऊ शकते. गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई), संजय धोत्रे (अकोला), अशोक नेते (गडचिरोली- चिमूर), कपील पाटील (भिवंडी) यांची नावेही भाजपकडून जाहीर होण्याचे संकेत आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर असलेल्या शिवसेनेच्या नाराजीमुळे गोयल यांचा पर्याय पक्षापुढे असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

 

 

Related posts

दिग्गज नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली, महाराष्ट्रात ‘चड्डी’चे राजकारण

News Desk

माझ्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्यावे !

News Desk

कन्हैया कुमार यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Gauri Tilekar