HW News Marathi
राजकारण

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

नवी दिल्ली | भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांतील नत्यांनी त्याचा पोस्टर्सवर वापर केला होता. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. परंतु यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्रे निवडणुकीच्या प्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीत दिली आहे.

तसेच सशस्त्र दल देशाच्या सीमा, राजकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही आयोगाने या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने केलेला एअर स्ट्राईकदरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांचे विमान कोसळले. यानंतर अभिनंदन शुक्रवारी (१ मार्च) रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी वाघा-अटारी बॉर्डरवरून मायदेशात परतले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

#LokSabhaElections2019 : राजू शेट्टी आघाडीसोबत राहणार

News Desk

‘सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा’ !

News Desk