HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे, महादेव जानकर यांच्या भेटी मागचे कारण काय ?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. महाराष्ट्र राज्याचे पशू, मत्स्य आणि दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची भेट घेतली आहे. महादेव जानकर आणि राज ठाकरे यांच्या भेटी मागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

परंतु राजकीय वर्तुळात मात्र या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारने फक्त आश्वासने दिली आहेत. परंतु प्रत्येक्षात मात्र या सरकारने कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. आगामी लोकसभा आणि विधासभा निवडणुका जवळ येत आल्यामुळे जानकर आणि ठाकरे यांची भेट ही महत्त्वाची मानली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

मराठा समाज राज्य सरकारवर नाराज, पुढील निर्णयासाठी घेणार बैठक

News Desk

विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक

Aprna