HW Marathi
राजकारण

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

नवी दिल्ली | “आम्ही रस्ते तयार करताना गुणवत्ता आणि कंत्राटदारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. त्यामुळे आमच्या कार्यकाळात तयार झालेले रस्ते दीर्घकाळ टिकतील”, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. “आमच्या काळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर पुढील २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत”, असे नितीन गडकरींनी सांगितले आहे. नितीन गडकरींच्या हस्ते शुक्रवारी (८ जानेवारी) ७१९५ कोटी रुपयांच्या पाच प्रकल्पांचे भूमीपूजन झाले. यावेळी ते बोलत होते.

“उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलत आहे. आमच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत. कारण आम्ही दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही”, असे गडकरी म्हणाले. “मी गेल्या दौऱ्यात ज्या प्रकल्पांची घोषणा केली, ते काम आता सुरू होईल. आता ज्या प्रकल्पांचे भूमीपूजन झाले आहे त्यावर पुढील दोन महिन्यात काम सुरू होईल”, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी गडकरींनी राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणे प्रकर्षाने टाळले आहे.

Related posts

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

News Desk

बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा ?

News Desk

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk