HW Marathi
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेदरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती

कोलकाता | पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. या सभेवेळी संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जीं टीका केली होती. मोदींच्या या सभेदरम्यान बंगालमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. या गर्दीमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला असून सभेत लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यात अनेकजण जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मोदींनी अर्ध्याया १४ मिनिटात भाषण संपवावे लागले. जनेतेने दाखवलेल्या प्रेमाबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले.

मोदींची सभा सुरू झाल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन सभा ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी लोकांना जागेवर बसूनच सभा ऐकण्याचे आवाहन केले होते. विशेषत: महिलांना उद्देशून मोदींनी हे आवाहन केले होते. मात्र, चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येताच मोदींनी भाषणासाठी पुढील ठिकाणी जायचे असल्याचे सांगत आपले भाषण मध्येच बंद केले. दरम्यान, जखमी महिला आणि मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Related posts

खडसे, दमानिया वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk

निर्मला सीतारमण आज लोकसभेत मांडणार अर्थसंकल्प

अपर्णा गोतपागर

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

News Desk