HW News Marathi
राजकारण

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेदरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती

कोलकाता | पश्चिम बंगालच्या ठाकूरनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. या सभेवेळी संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जीं टीका केली होती. मोदींच्या या सभेदरम्यान बंगालमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. या गर्दीमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला असून सभेत लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. यात अनेकजण जखमी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर मोदींनी अर्ध्याया १४ मिनिटात भाषण संपवावे लागले. जनेतेने दाखवलेल्या प्रेमाबाबत त्यांनी जनतेचे आभार मानले.

मोदींची सभा सुरू झाल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन सभा ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी लोकांना जागेवर बसूनच सभा ऐकण्याचे आवाहन केले होते. विशेषत: महिलांना उद्देशून मोदींनी हे आवाहन केले होते. मात्र, चेंगराचेंगरीची परिस्थिती दिसून येताच मोदींनी भाषणासाठी पुढील ठिकाणी जायचे असल्याचे सांगत आपले भाषण मध्येच बंद केले. दरम्यान, जखमी महिला आणि मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे अन् माझ्यात कोणतीही भिंत नाही !

News Desk

“…राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय”, शरद पवारांची मिश्किल टीका

Aprna

डॉ. आंबेडकरांचा पुतळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात उभारणार !

News Desk