HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तांतरावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 फेब्रुवारी) राज्यातील सत्तांतरावरची सुनावणी संपली असून आज जवळपास चार तास सत्तांतरावर सुनावणी झाली. ठाकरे गटाकडूनच आज सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद झाला आहे. या प्रकरणाची ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील अभिषेक मनु संघवी आणि वकील देवदत्त कामत या तीन वकीलांनी ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला आहे. हे संपूर्ण प्रकरण पाच न्यायधीशाच्या घटनापीठाकडेच राहणार की सात न्यायधीशाच्या घटनापीठाकडे जाणार, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी निर्णय झालेला नाही. कारण आज सुनावणीपुर्ण न झाल्यामुळे यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. शिंदे गटाच्या बाजूने उद्या (15 फेब्रुवारी) उर्वरित युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

दरम्यान, आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होते. परंतु, हरीश साळवे यांच्या युक्तीवादाची वेळ ही चार वाजेपर्यंत येऊ शकली नाही. या प्रकरणाचा उर्वरित युक्तीवाद हा उद्या सकाळी होईल. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस राज्यातील सत्तांतरासाठी दिलेले आहेत. यामुळे उद्या शिंदे गटाची सुनावणी झाल्यानंतरच कळेलच की या प्रकरणाला कोणते वळण येईल ते कळेल.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदारांच्या अपात्रेच्या मुद्यावर राज्यातील सत्तांतर प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. परंतु, नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने असे होऊ शकत नाही, असे म्हटले. यासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

Related posts

राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते – जे.पी.नड्डा

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

अफगाणिस्तानमधील पायाभूत सुविधांमध्ये मोदी सरकार गुंतवणूक सुरु ठेवणार का?; गडकरींनी दिलं उत्तर; म्हणाले…

News Desk