HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील सत्तांतरावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; आजचा युक्तीवाद पूर्ण

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयात आज (3 ऑगस्ट) दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण केला आहे. न्यायालयात उद्या (4 ऑगस्ट) सकाळी पहिल्या क्रमकांचे प्रकरण आहे. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गट, ठाकरे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद करण्यात आले आहेत. न्यायालयाने आज सर्व बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतले आहेत.

न्यायालयाचे कामकाज सुरू होताच महाराष्ट्राचे सत्तांतरणाचे प्रकरण हे पहिल्या क्रमकांचे प्रकरण आहे. न्यायालयात युक्तीवादासाठी पुन्हासमोर येईल. या प्रकरणासंबंधित युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. उद्या न्यायालयात कोणता नवा युक्तीवाद होतो. आणि न्यायालया महाराष्ट्रातील सत्तांतरावर कोणता निर्णय देणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

न्यायालयात या  5 याचिकेवर झाला युक्तीवाद 
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका
संबंधित बातम्या

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, पुढे कसे जाणार ?

News Desk

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk

जावेद हबीब यांचा भाजप प्रवेश, मोदींसह दिग्गजांना नेटकऱ्यांनी दिला नवा लूक

News Desk