HW News Marathi
राजकारण

रायगडमध्ये संशयास्पद बोटीचा दहशतवादी अँगल दिसून येत नाही! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | “रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर किनाऱ्यावर सापडलेली संशयास्पद बोटतचा सध्या तरी दहशतवादी अँगल दिसून येत नाही. ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात दिली. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन जिल्हा रायगडा किनाऱ्यावर आज (18 ऑगस्ट)  येथे दोन संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 राईफल आणि 225 काडतुसे गोळ्या रायफल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरिहरेश्वरमध्ये आढळलेल्या एका लहान बोटीमध्ये तीन एके-47 रायफल सापडली असून हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत  लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहेत. या बोटीमध्ये 10 संशयास्पद बॉक्स आढळून आले आहेत. या प्रकरणाचे पडसाद आज (18 ऑगस्ट) राज्याच्या पावसाळी अधिवेशनात देखील पडले.

फडणवीस म्हणाले, “हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन जिल्हा रायगडा किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छीमारांना मिळून आली. स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना कळावल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. या बोटीत तीन एके-47 रायफल आणि त्यांचा दारु गोळा तसेच बोटीसंबंधित कागतपत्रे मिळून आली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. आणि हाय अलर्ट जारी करण्यात आले. याबाबत तात्काळ भारतीय कोस्ट गार्ड आणि इतर संबंधित कल्पनांना देण्यात आली. आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदर बोटीचे नाव ‘लेडीहान’ असून तिची मालकी ऑस्टेलियन नागरिक हाना लाँर्डरगन या महिलेची आहे. या महिलेचे पती जेम्स हॉबर्ट हा सदर बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होते.”

दरम्यान, फडणवीस पुढे म्हणाले, “26 जून रोजी सकाळी 10 वाजता बोटीचे इंजिन निकामी झाले होते. आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. 13 वाजताच्या सुमारास एका कोरिअन युद्ध नौकेने बोटीवरील बोटीवरील खलाशांची सुटाक  केली. आणि त्यांना ओमानला सुपूर्त केला. समुद्र खवळलेला असल्याने ‘लेडीहान’ या बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्यावर आलेली आहे, अशी माहिती भारतीय कोस्ट गार्डकडून प्राप्त झालेली आहे.”

“सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक हे दोघेही मिळून करीत असून आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय संस्था यांचेशी सतत संपर्क चालू असून बारकाईने पुढील तपास करण्यात येत आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

“यासंदर्भात माहिती जरी प्राप्त झाली असली तरी कुठेही याबद्दल कमी राहू नये, या दृष्टीने सगळीकडे नाका बंदीचे आदेश दिलेले आहेत. सणांचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी कुठलेही घटना घडणार नाही. याकडे लक्ष ठेवण्याकरता सांगितले आहे. आणि केंद्रीय यंत्रणा यासंदर्भात आपल्यासोबत सतत संपर्क ठेवून आहेत. यासंदर्भात जरी ही अधिकृत माहिती मिळाली असतील तरी, सगळ्या उपायोजना केल्याजातील. आणि त्या ठिकाणी पूर्ण काळजी घेतली जाईल. एटीएस देखील त्या ठिकाणी लक्ष घालतील. आणि अवश्यक असेल तर जास्तची मदत देखील दिला जाईल. ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. त्या सर्व गोष्टी केल्या जाईल.”

 

संबंधित बातम्या

रायगडमध्ये संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसे सापडले; राज्यभरात ‘हाय अलर्ट’

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

राज्य सरकारच्या बहुसदस्यीय प्रभाग निर्णयावर नाना पटोलेंची प्रतिक्रीया –

News Desk

सरकार जर स्वच्छ आणि पारदर्शी असेल तर आपण जेपीसीला का घाबरतो ?

News Desk