HW News Marathi
महाराष्ट्र

रायगडमध्ये संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसे सापडले; राज्यभरात ‘हाय अलर्ट’

मुंबई | रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथे दोन संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये तीन एके-47 राईफल आणि 225 काडतुस गोळ्या रायफल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरिहरेश्वरमध्ये आढळलेल्या एका लहान बोटीमध्ये तीन एक-47 रायफल सापडली असून हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीत  लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले आहेत. या बोटीमध्ये 10 संशयास्पद बॉक्स आढळून आले आहेत. या बोटींवर 2 इंडोनेशियन नागरिक आढळून आल्याची माहिती आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली  पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर केले आहे. स्थानिकांच्या मदतीने दोन बोट ताब्यात घेण्यात आली.  या प्रकरणाची माहिती मिळताच एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. या पार्श्भूमीवर राज्यभरात  हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

News Desk

राज ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीकडे आधी दुर्लक्ष नंतर घेतली कडक अॅक्शन

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरेतील मेट्रो कारशेडला हिरवा कंदील

News Desk