HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission ) उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. परंतु, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अजून चिन्ह दिले नाही. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून निवडणूक आयोगाकडे आज (१० ऑक्टोबर) पक्षाचे चिन्ह आणि नावाची कागद पत्रे सादर केल्यानंतर निर्णय घेतला आहे.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाने त्रिशूळ चिन्हांची मागणी केली होती. परंतु, त्रिशूळ हे धार्मिक असल्यामुळे निवडणूक आयोगाने हे चिन्हचिन्ह दिले नाही. तर तामिळनाडू मधील एका पक्षाचे उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

 उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल हे तीन चिन्ह निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर शिंदे गटाने देखील उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा हे तीन चिन्ह दिले तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे दिली होती. आज निवडणूक आयोगाकडे सादर केले होती. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उगवता सूर्य आणि त्रिशूळ या दोन चिन्हावर दावा केला होता. परंतु, निवडणूक आयोगाने त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याने ते दिले नाही. तर शिंदे गटाला अजूनही चिन्ह दिले गेले नाही.

Related posts

राम कदम बेताल वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर होत आहेत ट्रोल

News Desk

मधुकर कुकडेंनी घेतली शरद पवारांची भेट  

swarit

LIVE UPDATES | शिवतीर्थावरुन शिवसेनेचा दसरा मेळावा-२०१८

News Desk