May 24, 2019
HW Marathi
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : दुसऱ्या टटप्प्याच्या मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली | छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (२० नोव्हेंबर)ला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या  टप्प्याच्या निवडणुकांतील ७२ जागांवर एकूण १ हजार ७९ उमेदवार रिंगणात आहेत.  यामध्ये ११९ महिला उमेदवारांचाही समावेश आहे. राज्यातील रायपूरनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवार आणि बिंद्रानवागढमध्ये सर्वाधिक कमी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एकूण १९ जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ असून, मतदानाच्या काळात गडबड होऊ नये, यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी एक लाखांहून अधिक पोलीस व राखीव पोलीस तिथे आणण्यात आले आहेत. गरियाबंद, धमतरी, महासमुंद, कबीरधाम, जसपूर आणि बलरामपूर या भागांत नक्षलवाद्यांचा हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात येथे १८ जागांसाठी मतदान झाले होते. छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपले आहे. मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

 

Related posts

LIVE UPDATES | शिवतीर्थावरुन शिवसेनेचा दसरा मेळावा-२०१८

News Desk

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

News Desk

संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका लढवणार

News Desk