May 24, 2019
HW Marathi
राजकारण

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

रायपूर | छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपले आहे. मतदानाला सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ७० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.  तर छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये संध्याकाळी ४.३० पर्यंत ५६.५८ टक्के मतदान झाले होते.

छत्तीसगड  काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी १२ गावांतील नागरिकांना घरातच कोंडून ठेवले होते. यामुळे या गावांमध्ये मतदान होऊ शकले नाही. तर काही ठिकाणी झोपड्या, तंबू उभारून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. तसेच एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी स्फोटही घडवून आणला. तरी काही ठिकाणी मतदान केंद्रत गेलेल्या बहुतांश लोकांचे नावे मतदार यादीतून गहाळ झाले. त्यामुळे लोकांनी मतदान केंद्र बाहेर येऊन गोंधळ घातला. हा सर्व प्रकार जगदलपूरच्या गांधी नगरमधील अनेकांची नावे मतदारयादीतून गायब लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान फक्त १ टक्के ईव्हीएम मशिन आणि १.९ टक्के व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्याने तात्काळ बदलण्यात आल्या.

Related posts

मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी

News Desk

भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा

News Desk

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk