HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, अजित पवारांचे आव्हान

मुंबई | “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी शेतकऱ्यांविरोधात कोणतेही काम करणार नाही. मावळच्या गोळीबारासंदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन”, असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. “जेव्हा मावळचे शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत होते. तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळी झाडण्याचे आदेश दिले होते”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ एप्रिल) पवार कुटुंबावर सडकून टीका केली. त्या पार्श्वभूमीवर आज (२ एप्रिल) अजित पवार बोलत होते.

“मावळच्या गोळीबारासंदर्भात माझे प्रशासनाशी कोणतेही संभाषण विरोधकांकडे असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. माझ्यावर वारंवार असे खोटे आरोप होत आहेत. जे माझ्यावर असे आरोप करत आहेत त्यांनी आपली सगळी राजकीय ताकद पणाला लावून चौकशी अहवाल जनतेसमोर ठेवावा”, असे आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार हे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर बोलत होते.

“शरद पवार स्वत: शेतकरी असून देखील शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या समस्या विसरले. त्यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जेव्हा मावळचे शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत होते. तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळी झाडण्याचे आदेश दिले होते”, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती.

Related posts

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk

मध्य प्रदेशात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात खत पुरवठा

News Desk

मान्सूनची ‘नांदी’ तरी पाणी‘बंदी’, हे संकट भयंकर !

News Desk