HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणारच नाही !

मुंबई | “आम्ही जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणार नाही”, असे विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपने आपल्या मित्र पक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र, मित्रपक्षांनी आम्ही आमच्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर, रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात भाजपप्रणित एनडीए सरकारला घवघवीत यश मिळाले. या यशात भाजपला त्यांच्या मित्रपक्षांची खंबीर साथ लाभली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी भाजपकडून होत असताना मित्र पक्षांचा मात्र यास नकार असल्याचे दिसून येत आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मित्रपक्षांनी भाजपच्या नव्हे तर स्वतःच्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. टिकवून ठेवण्यासाठी ते आपल्या मतांवर ठाम आहेत.

Related posts

भाजप-सेनेची युती हा केवळ सत्तेसाठीचा स्वार्थ !

News Desk

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk

मोदी सरकार सर्वच आंदोलनांवर तोडगा काढण्यात अपयशी | मनमोहन सिंग

News Desk