नवी दिल्ली | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु असल्याचे दिसत आहे. आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी काँग्रेससह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे. “देशातील महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहिले जात असताना काँग्रेसला भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याची गरज का पडते ?, असा टोला राम माधव यांनी लगावला आहे.
Ram Madhav,BJP: If Rahul Gandhi could've been option for PM candidate because of recent victories,then there would've been no need for Mahagathbandhan.Even today, no one,except Stalin, is ready to confirm name of the leader of Mahagathbandhan. There're 6 ppl in queue to become PM https://t.co/Xv3hRwmp4x
— ANI (@ANI) December 26, 2018
एकीकडे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेसकडून महाआघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राम माधव यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
आता आम्ही नव्या मित्रपक्षांच्या शोधात
भाजप युतीसाठी तडजोड करण्यास तयार असल्याचे संकेत देखील यावेळी राम माधव यांनी दिले आहेत. “राजकारणात आघाडी किंवा युतीबाबत कोणताही निर्णय घेताना तडजोड ही करावीच लागलते. आम्ही आता पूर्व आणि दक्षिण भारतात नव्या मित्र पक्षांचा शोधात आहोत”, असेही राम माधव यांनी यावेळी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.