मुंबई | “माझ्या एवढा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही”, असा उपहासात्मक टोला वंचित बहुजन आघाडीचे नेता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (11 जानेवारी) भेट झाली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि आंबेडकरांमध्ये बंद दाराआड युतीची चर्चा झाल्याची बातम्या माध्यमातून येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज (12 जानेवारी) पत्रकार परिषदे घेत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा, शिवसेनासोबत युती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आगामी निवडणुकीत युती आदी मुद्यांवर प्रकाश आंबेडकरांनी परखड मत मांडले.
उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करत नाही यामागे काय कारण असावे, या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी जे आम्हाला कळाविलेले आहे. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुद्धा बरोबर घेईचे आहे. आणि आपण एकत्र पत्रिकार परिषद घेऊन असेही त्यांनी कळविलेले आहे. म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला कळविलेले नाही, असे नाही, अही त्यांनी उत्तर दिले. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, “परंतु, आम्ही त्यांना एक सांगतोय की, काँग्रेसला मी फार चांगला ओळखतो, माझ्या एवढा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखणारा महाराष्ट्रात दुसरा नेता नाही. तुम्हाला हे केव्हा फसवितील आणि काल नाना पटोलेंनी पुन्हा उच्चारले. आम्ही असताना वेगळे लढणार आहोत. त्यामुळे आता शिवसेनेने थांबू नये, असा मेसेज आम्ही सरळ पाठविलेला आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष म्हणत आहे की, यांच्यासोबत अजून कोणत्याही चर्चा झालेल्या नाही, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी अनेक गोष्टी बोलत नाहीये, त्यांनी लोकांशी खरे खरे बोलावे, असे मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही सांगतोय. या सगळ्या मला हरण्यासारखे काही नाही. एक गोष्टी निश्चितपणे आहे जर ते लोकांसमोर खोरेच बोलत राहिले, मग जे जे काही चालेले आहे, ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही.”
उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेण्याच्या प्रयत्नात
युतीची घोषणा नाही केली तर तुमच्या मनात काही करेक्ट कार्यक्रम आहे का?, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेना आणि वंचित यांची आघाडी होणार, हे स्पष्ट आहे. हे मी याआधी देखील सांगितले होते. शिवसेना आणि वंचितमध्ये जागेवरून कोणताही वाद राहिलेला नाही. शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना असे वाटते की तेही वंचित त्यांच्यासोबत आले तर भाजपसोबत लढायला सोपे जाईल, असे अशी परिस्थिती आहे. आम्ही त्यांना सांगतोय की, हे तुमच्याबरोबर का? येणार नाही. निवडणुकीची जोपर्यंत घोषणा होत नाही. उद्धव ठाकरे हे शेवटपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत करतील. ज्या दिवशी नोटीस आले की, मग त्यांना ऑपशन राहत नाही.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.