HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकी राजकीय कोणतीही चर्चा झालेली नाही”, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आणि आंबेडकर या दोघांमध्ये आज (13 डिसेंबर) मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. त्यात काही वेगळे काही नाही, असे म्हणत आंबेडकरांनी राजकीय चर्चेसंदर्भात बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री आणि तुमच्यात राजकीय चर्चा झाली की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी आंबेडकरांनी विचारल्यावर ते म्हणाले, “प्रश्न असा आहे की, मी नेहमी म्हणालेलो आहे की, या कालावधीमध्ये वाचणे, हे अत्यंत कठीण आहे. आणि त्यांचे कारण असे आहे की, ऐवढी कठीण राजकीय परिस्थिती आहे की, कोण कोणाला भेटले, तर त्यापाठीमागे राजकारणा व्यतिरिक्त दुसरा वास येत नाही, अशी सध्याची परिस्थित आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, भूमिका सगळ्याच्या स्पष्ट आहेत की, 40 वर्ष राजकारणात आहे. काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत जेवढे चेपायचे आहे. तेवढे चेपले, परंतु, आम्ही कधीही भाजपसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही याआधी शिवसेनाला युतीची ऑफर दिली होती.  आम्ही त्यावेळेसही दिली होती. त्यावेळची परिस्थिती होती. भाजपची सात सोडा आम्ही तुमच्याबरोबर येतो. परंतु, त्यावेळी शिवसेना भाजपसोबत सात सोडायला तयार नव्हती. त्यातल्या त्यात वंचित बहुचन आघाडीचा प्रश्न आहे. माझ्या आंदाजाने आम्ही काँग्रेसबरोबर भांडत राहिलो. एकमेकांना शिव्या देत राहिलो. परंतु, काँग्रेसच्या विरोधकांबरोबर आम्ही राजकीय समझोता कधीच केलेला नाही. त्याही बैठकीमध्ये एकनाथ शिंदेबरोबर राजकीय चर्चा झाली अशी जर आपण म्हणालात. तर त्या काही तथ्य नाही. आणि काही अर्थ नाही.”

युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात

राष्ट्रवादी काँग्रेस हे वंचित बहुजनला महाविकासआघडीत सामावून घेण्यास इच्छूक नाही, असा सवाल आंबेडकरांनी विचारल्यावर ते म्हणाले, “हा बॉल आमच्या कोर्टात नाहीय, हा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे की, त्यांनी कोणाबरोबर जायाचे किंवा कोणाबरोबर नाही. आम्हाला जर आयसोलेशन केले तर आम्ही एकटेच लढू.” आंबेडकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हटल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या नेत्याला भेटावे लागते.”

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री आणि आंबेडकर यांची मंत्रालयात बैठक; राजकीय विषयावर चर्चा होण्याची शक्यता

Related posts

मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्यानंतर करा !

swarit

काँग्रेस विजयाच्या अती आनंदामुळे कार्यकर्त्याचा मृत्यू

News Desk

संबित पात्रांच्या व्हिडीओमुळे मोदी सरकारची उज्ज्वला योजना गोत्यात

News Desk