HW News Marathi
राजकारण

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

मुंबई | महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय पुजा ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु यंदा ही पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्रातील परळी येथे मराठा बांधव गेले ५ दिवस ठिय्या आंदोलन करत आहेत.

मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने ५८ मूक मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद दिला नाही. तब्बल २ वर्षे संयमाने लोक चळवळ चालवूनही सरकारने दखल घेतली नाही. म्हणून मराठा समाजाने आता ठोक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. आणि पुन्हा एकदा राज्यात ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.

तसेच आषाढी यात्रा काळात आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील आंदोलकांनी राज्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आषाढी यात्रेच्या काळात आंदोलन केली आहेत. या आंदोलनांमुळे बड्या राजकीय नेत्या मंडळींना विठ्ठलाची शासकीय पुजा करता आली नाही.

जाणून घ्या.. किती राजकीय नेते मंडळींना आंदोलनांमुळे पुजेला हजर राहिले नाही…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना १९९७ मध्ये मुंबई येथील घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या गोळीबार झाला होता. या घटनेनंतर दलित संघटनांनी मनोहर यांच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. यांचे तीव्र पडसात पंढरपुरातील आषाढी यात्रेवर पडले होते. यामुळे मनोहर जोशी यांना पंढरपूरातील विठ्ठलाची पुजा करता आली नव्हाती. मनोहर जोशी यांच्या काळातील राज्याचे मुख्य सचिवांनी ही पूजा केली होती.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलनानंतर पूजेला जाणे रद्द केले यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडकर यांनी पंढरपुरातील शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पुजेला जाता आले नाही.

Related posts

विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

News Desk

नितीन गडकरी यांनी विकासकामांची यादी कृष्णकुंजवर पाठवली

News Desk

सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत !

News Desk