नवी दिल्ली | ‘यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा, लवकरच काम सुरू होणार आहे. दिवाळी झाल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे पाहू’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. अयोद्धा राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला असताना योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ राजस्थान मधील एका कार्यक्रमात बोलत होते.
Light a diya for Lord Ram this time, work there will start very soon. We have to take this up after #Diwali: CM Yogi Adityanath in Rajasthan's Bikaner (3.11.18) pic.twitter.com/IL8cuosBaW
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 4, 2018
“राम मंदिराचे प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे’, असे केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे जर न्यायालयाच्या निकालासाठी वेळ लागणार असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी वैयक्तिक मागणी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अयोध्या राम मंदिराचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केवळ मतांचे राजकारण करीत असताना दिसत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.