HW Marathi
राजकारण

या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही !

मुंबई | “किडनी घ्या पण, बियाणे द्या”, अशी करुण मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९अन्वये सभागृहात मांडला. मात्र, धनंजय मुंडे यांची ही मागणी फेटाळण्यात आली. त्यावर या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही असे म्हणत मुंडे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला आहे.

“गेल्या ३ वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सततचा दुष्काळ आहे. शेतकरी पूर्ण होरपळून निघाला आहे. दुष्काळाला कंटाळून शेणगाव तालुक्यातील नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्याने “किडनी घ्या पण, बियाणे द्या” अशी करुण मागणी त्याने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी” अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

“राज्यातला शेतकरी प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. भीषण दुष्काळाशी सामना करतो आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला नाही,”असेही धनंजय मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांना पूर्वमशागतीसाठी पेरणीसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदतीची अशी मागणी देखील मुंडे यांनी केली आहे.

Related posts

शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर !

News Desk

बीजेपी से बेटी बचाओ

News Desk

…म्हणून प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आली ३ वेळा शपथ घेण्याची वेळ

News Desk