नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या वाद तसेच यातील राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भूमिका यावर सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठे तर्क वितर्क लढविले जात आहेत.सीबीआय विरुद्ध कोलकाता स्थानिक पोलीस यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (५ फेब्रुवारी) सुनावणी झाली. यावर ममता बॅनर्जींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमच्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा नैतिक विजय असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करू. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे अधिकारी वर्गाचे मनोबल उंचावेल”, असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला आहे.
West Bengal CM Mamata Banerjee on SC will direct the Police Commissioner, Kolkata to make himself available&fully cooperate: Rajeev Kumar never said he'll not be available. He said we want to meet at mutual place,if you want to ask for any clarification, you can come & we can sit pic.twitter.com/5gLZ4lBi2o
— ANI (@ANI) February 5, 2019
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?
सर्वोच्च न्यायालयाने कोलकात्याच्या पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळीच राजीव कुमार यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात कोलकात्याच्या पोलीस आयुक्त चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र राजीव कुमार यांची पाठराखण करत असे काही नसल्याचे म्हटले आहे.
सीबीआयला राजीव कुमार यांना अटकच करायची होती !
“राजीव कुमार यांनी सीबीआयला सहकार्य करण्यास कधीही नकार दिला नाही. मी चौकशीसाठी उपलब्ध असेन, असेही राजीव कुमार यांनी सांगितले होते. मात्र, सीबीआयला त्यांना थेटच अटक करायची होती. सीबीआयचे पथक कोणतेही वॉरंट नसताना त्यांच्या घरी गेले”, असे ममता बॅनर्जींचे म्हणणे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.