HW Marathi
राजकारण

हा नवा भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही !

नवी दिल्ली | भारताने उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर काय कारवाई केली सर्वांनाच माहित आहे. हा नवीन भारत कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी कन्याकुमारीमधील विविध विकासकामांचे भूमिजन करण्यात आले. देशाच्या पहिल्या संरक्षणमंत्री आणि विंग कमांडर अभिनंदन तामिळ आहेत याचा आपल्याला अभिमान असल्याचे देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

“गेल्या काही दिवसांपासून देशभरात घडलेल्या घडामोडींमधून भारतीय सैन्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे. हा नवीन भारत कोणत्याही प्रकारे दहशतवाद सहन करणार नाही. त्यांनी उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले मात्र २६/११ च्या हल्ल्यानंतर मात्र तसे झाले नाही”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी तत्कालीन सरकारवर सडकून टीका केली आहे.

Related posts

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळते !

News Desk

#JammuAndKashmir : लोकसभा आणि राज्यसभेत अमित शहांचे निवेदन

News Desk

राम मंदिर प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसचा हस्तक्षेप !

News Desk