HW News Marathi
राजकारण

यंदा आमचा विजय निश्चित !

कणकवली । राज्यातील विधानसभेकरिता सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नुकताच आपला ‘स्वाभिमान पक्ष’ भाजपमध्ये विलीन करणारे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी देखील सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, “ही निवडणूक एकतर्फी होणार असून आपल्याला ८० टक्के मतं मिळणार” असा दावा नारायण राणेंनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

यंदाची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार असून आम्हाला ८० टक्के मते मिळणार असल्याचा दावा यावेळी नारायण राणे यांनी केला आहे. आमची आणि भाजपाची मते एकत्र आली तर आम्ही ७० टक्केच्या जवळपास पोहोचू असेही नारायण राणे म्हणाले. एकीकडे नारायण राणेंनी हा दावा केलेला असताना दुस्टिकडे नितेश राणे देखील आपल्या नंबर 1 च्या विजयाचा दावा करत आहेत.

“कणकवली मतदारसंघातून मला महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य मिळेल”, असा दावा नितेश यांनी केला आहे.”आम्ही गेल्या ५ पाच वर्षात केलेली कामे आणि आता भाजपची साथ यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे”, असे नितेश राणे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

फोटोसेशनवरून राहुल गांधींची मोदींवर टिका

News Desk

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk