HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती !

मुंबई | “जे कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ या शब्दात हिणवले त्याच कॉंग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा खरंच मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे”, अशी शब्दात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “हा देश सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खडड्यात जायला मनसे पक्ष आहे काय ?”, असा उपरोधिक सवाल विनोद तावडे यांनी यावेळी केला आहे.

“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर चालेल का ? हे आधी शरद पवार यांना विचारुन घ्यावे. नाहीतर पुढील तुमच्या स्क्रिप्ट बंद होतील”, अशीही बोचरी टीका यावेळी विनोद तावडे यांनी केली आहे. “कालच्या मेळाव्यातील भाषणासाठी राज ठाकरे यांनी जसे कष्ट घेतले ते आधी घेतले असते तर आज दुस-यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वतःचे इंजिन आता बंद पडले ते सध्या दुस-याला लावून चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत”

“भारतामध्ये लोकशाही नसती व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स हयुमन राईटस कौन्सिलच्या टॉप मोस्ट बॉडीवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का ? मग जगातील सर्व देश मुर्ख आहेत आणि तुमचेच खर आहे का ?”, असाही प्रश्न यावेळी विनोद तावडे यांनी केला आहे.

Related posts

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

News Desk

प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता सुशिलकुमार शिंदेंची डोकेदुखी ठरणार ?

News Desk

राजस्थानमध्ये भर रस्त्यात सापडले बॅलेट युनिट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk