HW Marathi
राजकारण

यंदा बारामतीत भाजपचे कमळ फुलवू, मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई | “बारामतीत भाजपचे कमळ फुलवू. आम्ही २०१४ साली राज्यात लोकसभेच्या ४२ जागा जिंकलो होते, यावेळी ४३ जागा जिंकणार आहोत. ती ४३ वी जागा बारामतीची असेल”, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आज (९ फेब्रुवारी) पुण्यात भाजपच्या बूथ प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.

“भाजप हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.  २०१४ ते २०१९ दरम्यान घराणेशाही संपुष्टात आली. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना आम्ही हद्दपार केले. जे त्यांनी ५५ वर्षात नाही केले ते आम्ही ५५ महिन्यांमध्ये केले.  महागठबंधन जिंकल्यास पुन्हा जातीयवाद फोफावेल”, असे म्हणत यावेळी अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामुळे शेतकरी आणि कामगार वर्गाला मोठा फायदा झाला”, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

ममता दीदी घाबरल्या होत्या !

“भाजपच्या यात्रेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करणारे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र एका चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांचा आयबी अधिकारी म्हणाला, “कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता. ममता दीदी घाबरल्या होत्या. म्हणूनच आम्ही अशी तक्रार केली,” असे अमित शाह यावेळी म्हणाले.

Related posts

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

News Desk

फेसबुकचे १५ हजार लाइक्स मिळवून देणार विधानसभेचे तिकीट ?

News Desk

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

News Desk