HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

कोलकाता | सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध टीएमसी अशी अत्यंत आक्रमक लढत सुरु आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील वारंवार पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, या संघर्षाने आता हिंसक वळण घेतले आहे. कोलकाता येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रॅलीदरम्यान आज (१४ मे) भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. या रॅलीदरम्यान चक्क अमित शहा यांच्या ट्रकवर काठ्या भिरकावण्यात आल्या. त्याचप्रमाणे भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा भाजपसरकारविरोधात हल्लाबोल…

News Desk

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk

महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित चेहऱ्यांचे भविष्य आज होणार सीलबंद

News Desk