HW News Marathi
राजकारण

आज थेट ‘शिवसेना भवनावर’ धडकला विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा मोर्चा

मुंबई | मुंबई महापालिकेच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी सोमवारी (४ मार्च)‘मातोश्री’बाहेर आंदोलन केले होते. “महापालिकेने मान्यता दिलेल्या १०४ विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे”, या मागणीसाठी या शाळांच्या शिक्षकांनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन केले होते. “साहेब मराठी शाळा वाचवा”, अशी हाक यावेळी या शिक्षकांनी दिली होती. मंगळवारी (५ मार्च) पुन्हा या शिक्षकांचा हा मोर्चा थेट “शिवसेना भवना’वर धडकला आहे. राज सरकार आणि महानगरपालिकेकडून अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात असून जोपर्यंत अनुदान जाहीर केले जात नाही तोपर्यंत आम्ही सेनाभवनावर ठिय्या आंदोलन करणार”, असा इशारा देण्यात आला आहे.

तब्बल गेले २२ दिवस आझाद मैदानावर विनाअनुदानित शाळांच्या या शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. काल (५ मार्च) शिवसेना नेते अनिल परब यांच्या चर्चा करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. तसेच, पुढील २ दिवसांमध्ये तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करु, असा इशारा देखील शिक्षकांकडून देण्यात आला होता. आज पुन्हा शिक्षकांचा हा मोर्चा शिवसेना भवनावर धडकला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधीच काम केले | ओवेसी

News Desk

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी

News Desk

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

Aprna