HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

रणजितसिंह नाईक निंबाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादीची घोषणा केली जात आहेत. निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंड करत पक्षाला राम राम ठोकण्याचे प्रकार सध्या राजकारणात सर्रास पाहाला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा काँग्रेसचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर आज (२५ मार्च) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बहुचर्चित अशा माढा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढातून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीनंतर या मतदार संघातून नक्की कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Related posts

ममतांना मोठा धक्का, राजीव कुमार यांना सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश

News Desk

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk

काँग्रेसने केवळ मतांसाठी अनुसूचित जातींचा वापर करून घेतला !

News Desk