HW News Marathi
राजकारण

लोकपाल नियुक्तीसाठी आजपासून अण्णा हजारेंचे बेमुदत उपोषण

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणले जावे, अशी मागणी केली होती. राज्य सरकारने मंगळवारी (२९ जानेवारी) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणले आहे. आता आजपासून (३० जानेवारी) अण्णा हजारेंच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राळेगणसिद्धी या आपल्या गावी अण्णा हजारेंच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.

“माझे हे उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरोधात नाही. देश आणि समाजाच्या हितासाठी मी वेळोवेळी आंदोलन करत आलो आहे. माझे हे आंदोलन देखील त्याच प्रकारचेआहे”, असे अण्णा हजारे म्हणाले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पद लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अण्णांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. यावेळी “कायदा विधानसभेत बनतो. त्यामुळे लवकरात लवकर विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊन कायदा बनणे आवश्यक आहे. म्हणूनच आंदोलन मागे घेणार नाही”, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

News Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna