HW News Marathi
राजकारण

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आज मतदान

मुंबई | राज्यात विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी आज (२१ मे) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी २४ मे रोजी होणार आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांसाठी सोमवार २१ मे रोजी मतदान होत आहे.

पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग रोहे, श्रीवर्धन, माणगाव आणि महाड येथील प्रांताधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या खेळीला चोख प्रत्युत्तर देत भाजपाने नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कुठे कुठे होत आहे आज मतदान

  • लातूर-बीड-उस्मानाबाद
  1. सुरेश धस(भाजप)
  2. अशोक जगदाळे( राष्ट्रवादी पुरस्कृत )
  • सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड
  1. अनिल तटकरे (राष्ट्रवादी)
  2. राजीव साबळे (शिवसेना)
  • नाशिक
  1. नरेंद्र दराडे -शिवसेना
  2. अॅड .शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)
  3. परवेझ कोकणी (अपक्ष)
  • अमरावती
  1. प्रविण पोटे-पाटील(भाजप)
  2. अनिल माधोगडिया (काँग्रेस)
  • परभणी-हिंगोली
  1. सुरेश देशमुख (कांग्रेस)
  2. विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
  1. इंद्रकुमार सराफ (कांग्रेस)
  2. रामदास आंबटकर (भाजप )

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

News Desk

एक घोट समाधानाचा

News Desk

राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा पेटंट मुद्दा नाही !

News Desk