HW News Marathi
राजकारण

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस सेवादलाची तिरंगा पदयात्रा

मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली सेवादलाच्या शेकडो कार्यकर्त्यांकडून आज (९ मार्च) टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती. केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या हुकुमशाही कारभारामुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ही पदयात्रा काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या अध्यक्षतेखाली सेवादलाच्या कोकण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला सेवादलाचे महाराष्ट्र प्रभारी श्री. मंगलसिंग सोळंकी यांच्यासह कोकण विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम येथून तिरंगा पदयात्रा काढली. हातात तिरंगा झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.

ही पदयात्रा पुढे म्हात्रे पेन इंडस्ट्रीज – शारदाश्रम – दादर पोलीस स्टेशनमार्गे टिळक भवन येथे पोहोचली व यात्रेचा समारोप झाला. प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस संजय तायडे पाटील, महिला प्रदेश संघटक वृषाली वाघचौरे, शेखर पाटील, व्ही. एस. राजगोपालन, मोनिका पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेकडो GR अद्यापही शासनाच्या वेबसाईटवर अपलोडच नाही; हजारो कोटीच्या गैरव्यवहाराचा संशय! – प्रविण दरेकर

Aprna

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

कॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान

News Desk