नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारणीपुढे ठेवला. मात्र, कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. राहुल गांधींनंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आज (२५ मे) मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, तृणमूल काँग्रेसकडून देखील ममता बॅनर्जींचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
West Bengal CM Mamata Banerjee: I told at the beginning of the meeting that I don't want to continue as the Chief Minister. pic.twitter.com/KZvH9oyTec
— ANI (@ANI) May 25, 2019
तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. यावेळी “विरोधी पक्ष संपूर्णच पराभूत कसा होऊ शकतो ?” असा सवाल उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर देखील शंका उपस्थित केली आहे. भाजपने आपल्या विजयासाठी राज्यात आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण केली, असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.