HW Marathi
राजकारण

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण, विरोधकांनी ‘डार्क डे’ म्हणून केला निषेध

मुंबई | नोटाबंदीला आज (८ नोव्हेंबर)ला दोन वर्ष पुर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटाबंद केल्याचे सांगितले. मोदींनी नोटाबंदी करण्याचा निर्णय हा काळा पैसा विरोधात उच्चलेले हे मोठे पाऊल आहे. परंतु मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर काही लोकांनी अक्षेप घेत म्हटले होती की, हा निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. मोदींच्या या निर्णयानंतर तब्बल तीन महीने सर्वसामान्य जनता ही बँकेच्या बाहेर जुन्या नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे होते.

नोटाबंदीला दोन वर्षे पुर्ण झाल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकार विरोधात घेराव करण्यास सुरुवात केले आहे. काँग्रेस नेता शशीर थरून यांनी ट्वीट करून नोटाबंदीनंतर सर्व सामान्यांना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला ते सांगण्याचा प्रयत्न करत  #DemonetisationDisasterDay केला. नोटाबंदी केल्यानंतर नवीन नोटा छापण्यासाठी ८ हजार करोड रुपयाचा खर्च आला, १५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि १०० लोकांनी आपले प्रण गमावले.

काँग्रेस व्यतिरिक्त विपक्षीय पक्षांनी देखील नोटाबंदीवरून मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालची मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बनर्जी यांनी मोदींच्या नोटाबंदीवर प्रश्न उपस्थित केले आहे. ममता बनर्जी यांनी म्हटले की, मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर करणे हा ‘डार्क डे’ असून नोटाबंदी हा एक मोठा घोटाळा करून देशातील लोकांना फसविले आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. ज्या लोकांनी नोटा बंदी केली, त्या लोकांना जनता शिक्षा देणार आहे, असे ममता बनर्जी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर केले आहे.

आरबीआयने वर्षिक अहवालामध्ये सांगितले की, एकूण ९९.३० टक्के ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा परत आल्या आहेत. आरबीआयच्या वर्षिक अहवालात नोटाबंदी संदर्भात संपुर्ण लेखा-जोखा दिला आहे.

 

Related posts

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

कवी कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

मुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा

News Desk