HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते !

मुंबई | भाजप-शिवसेनेच्या युतीचा नारळ आज (२४ मार्च) अखेर कोल्हापुरात फुटला आहे. कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर भाजप-सेनेची सभा झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. “फक्त स्वतःच्याच मुलांचे लाड करण्याचे आमचे संस्कार नाहीत. आम्ही आधी दुसऱ्यांच्या मुलांवर प्रेम करतो”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. “आता नुसते गिरीश महाजनांना बघितले तरी त्यांच्या मनात धाकधूक होते !”, असा खोचक टोलाही यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

 • मी जनतेसमोर नतमस्तक, तुमचे आशीर्वाद असतील तरच पुढे काहीतरी होऊ शकते.
 •  आता राजकीय धुळवड सुरु होईल. शिवजयंतीने संदेश दिला आहे कि बाकी रंग एका बाजूला आणि आमचा पवित्र भगवा एका बाजूला
 •  माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
 •  फक्त स्वतःच्याच मुलांचे लाड करण्याचे आमचे संस्कार नाहीत. आम्ही आधी दुसऱ्यांच्याच मुलांवर प्रेम करतो
 •  हा विजयाची मुहूर्तमेढ रोवणारा इव्हेन्ट
 • पवारांना भाजपमध्ये घेऊ नका
 •  मला कोल्हापूरचे दोन्ही खासदार यंदा दिल्लीत हवेत, असे मागणे देवी अंबाबाईकडे मागितले आहे
 • आपले पटत नव्हते तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यभर संघर्ष यात्रा काढल्या
 • आता गिरीश महाजन यांना बघितले कि त्यांना धाकधूक होते
 • बाजूला बसलेले असताना देखील हात लावून विचारतात ‘आहेस ना रे ?’, उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला
 • ५६ लोकांचे हातात हात आणि तंगड्यात तंगड
 •  विरोधकांमध्ये कोण शिल्लक राहिले ? हा प्रश्न आहे
 •  जर महाआघाडी जिंकली तर त्यांच्याकडे आहे तरी कोण आहे ?
 •  शरद पवारांना फक्त खुर्ची हवी
 • आम्हाला सत्ता, खुर्ची या गोरगरीब जनतेसाठी हवी
 • आम्ही देव, देश आणि जनतेसाठी युती केली
 • निवडणूक आलो कि राम मंदिर बांधणार, पाहिजे
 •  देश मजबूत हवा, मानवतेचा धर्म टिकवण्यासाठी आम्ही युती केली
 •  पाकिस्तानचा खेळाडू पंतप्रधान होतो, आपल्याकडे पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणार क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होतो
 •  शब्द दिला आणि तो पूर्ण केला म्हणून देवेंद्र फडणवीसांचा अभिमान वाटतो
 •  भगवा विधानसभेवर आणि लोकसभेवरही फडकला पाहिजे
 •  सदाभाऊंची तोफ मला हातकणंगलेमध्ये पाहिजे
 • आम्ही सर्वकाही प्रामाणिकपणे करत आहोत, तुमच्यासाठी करीत आहोत. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.

Related posts

2019च्या निवडणुकांमध्ये मोदी ना इथले राहतील ना तिथले। माजिद मेनन

News Desk

विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार !

News Desk

बाळासाहेबांचे विचार आपल्याला कायम मार्गदर्शन करतील !

News Desk