HW News Marathi
राजकारण

राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल

मुंबई | खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार, राणा दाम्पत्यानी ८ जून रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आली आहेत. राणा दाम्पत्याविरोधात  मुंबई पोलीस दोषारोप पत्र दाखल करणार आहे.

राणा दाम्पत्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केले होते. यानंतर पोलीस त्यांना खार या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा राणा दाम्पत्यांनी सरकारच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याना नोटीस बजावली आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्याना पोलिसांनी अटक केल्यानंतर तब्बल १४ हे दोघेही तुरुंगात होते. पोलिसांनी राणा दाम्पत्य तुरुंगात असताना त्यांच्यासोबत हिन वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. राणा दाम्पत्यानी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कारणास्तव मुंबई पोलिसांनी त्यांना आयपीसी कलम १२४ (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

Related posts

अजय माकन यांचा दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

News Desk

सुषमा स्वराज २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढविणार नाहीत

News Desk

पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर एक दिवसआधीच प्रचारबंदी घटनाविरोधी | काँग्रेस

News Desk