HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे!

मुंबई । भंडारा-गोंदिया मतदारसंघात येऊन गेले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर हल्ला केला. ‘आजकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यांना आपली झोप तिहार जेलमध्ये जमा झाल्याचा भास होत आहे. तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावत आहे,’ असे मोदी यांनी जाहीर केले. देशद्रोहाचे कलम रद्द करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले तसे मनी लॉण्डरिंग गुन्ह्याचे कलमही ते रद्द करणार आहेत काय? जेलचा भत्ता अनेकांना खावा लागेल अशी स्थिती आहे. आपले सरकार आले तर पाचशेच्या जुन्या नोटा बदलून देऊ. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे श्री. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. अशा नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक मान्यता देईल काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. निवडणूक आयोगाने आंबेडकरांचे काय घोडे मारले आहे व निवडणूक आयोगाला धमकावणे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? हे कोडे आता ऍड. आंबेडकरांनीच सोडवायला हवे. तिहारमधील ‘पोपट’ कधी बोलेल ते कोणीच सांगू शकत नाही, पण पोपटाने दिलेल्या माहितीवरच मोदी यांनी भंडारा-गोंदियात फटाके फोडले, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राषट्रवादी यांच्या नेत्यावर टीका केली.

 

सामनाचे आजचे संपादकीय

 

मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावत आहे, असे मोदी यांनी जाहीर केले. तिहार जेलमध्ये कोण आहे व त्याने तोंड उघडले तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे. तिहारमधील ‘पोपट’ कधी बोलेल ते कोणीच सांगू शकत नाही, पण पोपटाने दिलेल्या माहितीवरच मोदी यांनी भंडारा-गोंदियात फटाके फोडले. मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार, हा प्रश्न आहेच.

2014 साली नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थानची घोषणा केली होती. आता 2019 साली निवडणूक प्रचारात मोदी यांनी सांगितले आहे की, 72 वर्षांत काँग्रेसने इतके खड्डे केले ते भरण्यातच पाच वर्षे निघून गेली. त्या भरलेल्या खड्ड्यांवर विकासाचा हायवे बनवण्यासाठी आणखी पाच वर्षे हवी आहेत. मोदी यांच्या बोलण्यात तथ्य आहे. काँग्रेसने घाण केली ती साफ करायला वेळ लागेल. मोदी यांचे राज्य आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. घोटाळे करणाऱ्यांना जरब बसली. मोदी हे बुधवारी भंडारा-गोंदिया मतदारसंघात येऊन गेले. तेथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांवर हल्ला केला. ‘आजकाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्रीची झोप येत नाही. त्यांना आपली झोप तिहार जेलमध्ये जमा झाल्याचा भास होत आहे. तिहार तुरुंगातील कोणीतरी आपले तोंड उघडेल आणि मग आपणही तिहार जेलमध्ये जाऊ ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेडसावत आहे,’ असे मोदी यांनी जाहीर केले. हे नेते लवकरच तिहार तुरुंगात जातील, असे पंतप्रधानांचे सांगणे आहे. मोदी यांनी भंडाऱ्यात येऊन एक कोडे टाकले व हसत हसत निघून गेले. त्यामुळे कुणाची झोप उडाली? तिहार जेलमध्ये कोण आहे व त्याने तोंड उघडले तर काँगेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते तुरुंगात जातील, हे कोडे आता मतदारांनी सोडवत बसायचे आहे. अर्थात पंतप्रधानांनी असे कोड्यात बोलायला नको होते व जे आहे ते स्पष्ट सांगून संभ्रम दूर करायला हवा होता.

तिहार जेलमध्ये
अशा काही व्यक्ती आहेत व त्या आधीच्या सरकारात ‘लॉबिंग’ करत होत्या. उद्योग व नागरी हवाई क्षेत्रात नियम मोडून कामे करून देणाऱया या व्यक्तींनी स्वतः कमाई केली व काही मंत्र्यांना कमाई करून दिली. या व्यक्तींत दीपक तलवारचे नाव सातत्याने घेतले जाते. तलवार सीबीआयच्या पकडीत आहे व त्याने विमान उड्डाण, विमानतळनिर्मितीत काही ‘गेम’ वाजवल्याची चर्चा होतीच. शिवाय इतर अनेक परदेशी कंपन्यांचा हस्तक म्हणूनही हे तलवार महाशय सत्ताधाऱ्यांच्या आतील वर्तुळात फिरत होते. फक्त राजकीय नव्हे, प्रशासनातील उच्च वर्तुळ व अगदी प्रधानमंत्री कार्यालयात तलवार यांच्यासाठी मुक्तद्वार होते. तलवार यांच्या पोटात अनेक राजकारण्यांची व आजीमाजी सत्ताधाऱ्यांची रहस्ये दडली आहेत. पोटातली रहस्ये ओठात येऊ नयेत म्हणून त्यापैकी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कोडय़ाचे उत्तर ‘तलवार’ तर नाही ना? मोदी यांनी टाकलेले कोडे शब्दकोडय़ाचा टाइमपास नाही, तर देशातील भ्रष्टाचार, सुरक्षा व उद्योग व्यवसायाशी निगडित असे हे कोडे आहे. पंतप्रधानांनी गोंदियात येऊन हे कोडे घालण्यापेक्षा दिल्लीतून जाहीरपणे ही तलवार फिरवली असती तर अनेक भ्रष्टाचाऱ्यांची गर्दन उडाली असती. मोदी यांच्या काळात रॉबर्ट वढेरा हे चौकशीला सामोरे गेले व हे ‘महान राष्ट्रभक्त’ सध्या अंतरिम जामिनावर आहेत. मनी लॉण्डरिंगच्या प्रकरणाची ‘तलवार’ रॉबर्टवर लटकलेली आहेच.

देशद्रोहाचे कलम
रद्द करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले तसे मनी लॉण्डरिंग गुन्ह्याचे कलमही ते रद्द करणार आहेत काय? जेलचा भत्ता अनेकांना खावा लागेल अशी स्थिती आहे. आपले सरकार आले तर पाचशेच्या जुन्या नोटा बदलून देऊ. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे श्री. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. अशा नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक मान्यता देईल काय? असा प्रश्न लोकांना पडू शकतो. निवडणूक आयोगाने आंबेडकरांचे काय घोडे मारले आहे व निवडणूक आयोगाला धमकावणे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? हे कोडे आता ऍड. आंबेडकरांनीच सोडवायला हवे. महाराष्ट्राचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सांगितले की, अजित पवारांची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच तेही तुरुंगात जातील. 2014 साली सत्ता आली तेव्हाच हे सर्व लोक तुरुंगात जायला हवे होते. तसे काहीच झाले नाही. भुजबळांच्या बाजूची कोठडी महाराष्ट्र सरकारने भरली नाही व तिहारमधील ‘पोपट’ कधी बोलेल ते कोणीच सांगू शकत नाही, पण पोपटाने दिलेल्या माहितीवरच मोदी यांनी भंडारा-गोंदियात फटाके फोडले. सगळय़ांच्याच कुंडल्या सत्ताधाऱ्यांकडे असतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकदा हेच सांगितले होते. मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार, हा प्रश्न आहेच.

Related posts

शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला !

News Desk

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीड वर्षातच दिला राजीनामा

rasika shinde

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Prathmesh Gogari