HW News Marathi
राजकारण

अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे !

मुंबई । सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स’ दिल्लीत आले व सर्व राजशिष्टाचार वगैरे बाजूला सारून या क्राऊन प्रिन्सच्या स्वागतासाठी आमचे पंतप्रधान विमानतळावर गेले. क्राऊन प्रिन्स’ दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानात होते व तेथील पंतप्रधान इम्रान खान हे प्रिन्स साहेबांची गाडी स्वतः चालवीत होते. तशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व त्या वेळीही प्रिन्स साहेबांच्या चेहऱयावर तेच स्मितहास्य तरळताना दिसले. हिंदुस्थानने ‘पुलवामा’चा बदला म्हणून पाकिस्तानवर हल्ला केला तर प्रतिहल्ला करू, आम्ही काही बांगडय़ा भरल्या नाहीत, अशी धमकी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने दिली. आमच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्प काय बोलतो? फ्रान्सचे विधान काय आहे? इराणसारख्या देशाने पाकिस्तानला खडे बोल सुनावल्यामुळे हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय कूटनीतीत कसा वरचढ चढला अशी आपण स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहोत. श्रीलंकेने लिट्टेसारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेचा साफ नाश करून देश दहशतवादमुक्त केल्यावर जगाने त्याची पाठ थोपटली होती. अमेरिकेने लादेनला पाकिस्तानात घुसून मारल्यावर जगाने त्यांच्या हिमतीला दाद दिली. इकडे आम्ही आमचीच पाठ कोणत्याही कृतीशिवाय थोपटत आहोत. अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे. ‘माझेही मन संतापाने पेटले आहे’ असे पंतप्रधान मोदी सांगतात. या पेटलेल्या संतापाचा वणवा पाकिस्तानात भडकलेला दिसू द्या, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर पाकिस्तान विरोधात ठोस पाऊले उचलायचे आवाहन केले आहे.

सामनाचे आजचे संपादीकय

हिंदुस्थानवर शस्त्र उचलण्याआधी तुमचे मनगट शिल्लक राहील काय ते बघा, असे अमेरिका किंवा फ्रान्ससारखी राष्ट्रे ठामपणे पाकिस्तानला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कुणाला सच्चे मित्र वगैरे मानायला तयार नाही. पाकिस्तानला एकटे पाडण्याची कूटनीती वगैरे ठीक आहे, पण एकटा मसूद अजहर हिंदुस्थानला त्रास देतोय. त्याचा कायमचा नाश करा, की मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत त्या कारवाईची वाट पाहायची? सोशल मीडियावरचे युद्ध थांबवून कठोर पावले टाकायला हवीत. अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे. ‘माझेही मन संतापाने पेटले आहे’ असे पंतप्रधान मोदी सांगतात. या पेटलेल्या संतापाचा वणवा पाकिस्तानात भडकलेला दिसू द्या.

पुलवामा हल्ल्याची शाब्दिक प्रतिक्रिया हिंदुस्थानने दिली आहे. आपल्याकडे शब्दांना तलवारीची धार असते. काहींच्या मते आमच्या शब्दांत स्फोटकांची विध्वंसक ताकद आहे, पण खरंच अशी ताकद आहे की नाही, हे प्रत्यक्ष कृतीशिवाय कसे समजणार? सध्या पाकिस्तानला धडा वगैरे शिकविण्याची जोरदार भाषा सर्वच स्तरांवर सुरू आहे. विशेषतः सोशल मीडियावर या पद्धतीचे खूप मेसेज फिरत आहेत. मात्र त्याची तेवढीच चेष्टादेखील केली जात आहे. आता एक व्यंगचित्र समाजमाध्यमांत फिरते आहे. कॉटखाली भेदरून लपलेल्या आपल्या नवऱयास बायको बाहेर यायला सांगते आहे, ‘‘अहो, सोशल मीडियावरील तुमची वीरश्री आणि आवेशपूर्ण प्रतिक्रिया वाचून लष्करी अधिकारी तुम्हाला सैन्यात भरती करून घेण्यासाठी आले आहेत. बाहेर निघा बिळातून.’’ समाजमाध्यमातील ‘हाऊ इज द जोश’ हा असा आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सध्या समाजमाध्यमांवर खेळले जात आहे. हे युद्ध भाजप, मोदीविरुद्ध इतर सारे असे आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीची ही सुरुवात आहे. पुलवामा हल्ला व बलिदान हा अशा प्रचाराचा भाग होऊ नये. इराक, इराण, अफगाणिस्तानमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांच्या रक्ताची किंमत अमेरिकेतील त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली. हिंदुस्थानात दुर्दैवाने तसे होत नाही. झाले तर उलटेच होते. सैनिकांचे बलिदान व दहशतवादी हल्ले ही निवडणुका जिंकण्यासाठी एक पर्वणीच मानली जाते व संपूर्ण प्रचार त्या हल्ल्याभोवतीच फिरत राहतो. हे ज्या देशात घडते तो देश दुश्मनांशी मुकाबला कसा करणार, हा प्रश्नच आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्याची भाषा जोरात सुरू आहे.

धडा शिकवा आणि

मग बोला. पठाणकोट, उरी आणि आता पुलवामा असे हे इजा-बिजा-तिजा झाल्यावरही आपण फक्त धमक्याच देत आहोत. आमच्या बाजूने डोनाल्ड ट्रम्प काय बोलतो? फ्रान्सचे विधान काय आहे? इराणसारख्या देशाने पाकिस्तानला खडे बोल सुनावल्यामुळे हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय कूटनीतीत कसा वरचढ चढला अशी आपण स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहोत. श्रीलंकेने लिट्टेसारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेचा साफ नाश करून देश दहशतवादमुक्त केल्यावर जगाने त्याची पाठ थोपटली होती. अमेरिकेने लादेनला पाकिस्तानात घुसून मारल्यावर जगाने त्यांच्या हिमतीला दाद दिली. इकडे आम्ही आमचीच पाठ कोणत्याही कृतीशिवाय थोपटत आहोत. सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स’ दिल्लीत आले व सर्व राजशिष्टाचार वगैरे बाजूला सारून या क्राऊन प्रिन्सच्या स्वागतासाठी आमचे पंतप्रधान विमानतळावर गेले. पंतप्रधान मोदी यांना विमानाच्या जिन्यापाशी पाहताच ‘क्राऊन प्रिन्स’च्या चेहऱयावर स्मितहास्य तरळले व त्यांनी झपझप जिना उतरून मोदींना अलिंगन दिले, अशा बातम्यांत व प्रसंगांत आपण नको तितके गुंतून पडलो आहोत. मात्र हेच ‘क्राऊन प्रिन्स’ दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानात होते व तेथील पंतप्रधान इम्रान खान हे प्रिन्स साहेबांची गाडी स्वतः चालवीत होते. तशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व त्या वेळीही प्रिन्स साहेबांच्या चेहऱयावर तेच स्मितहास्य तरळताना दिसले. हिंदुस्थानभेटीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतही प्रिन्स यांनी दहशतवादासंदर्भात चिंता वगैरे व्यक्त केली. सर्व बाबतीत आपण हिंदुस्थानसोबत आहोत असेही सांगितले, पण ‘पुलवामा’ हल्ल्यावर थेट आणि कुठलीही स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले. तेव्हा

जगाचे काही खरे

नाही. अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करणे वेगळे व कश्मीर हिंदुस्थानचाच भाग आहे असे जागतिक व्यासपीठावर ठणकावून सांगणे वेगळे. तसे अद्यापि घडलेले नाही. इराकचे दिवंगत राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी कश्मीरप्रश्नी हिंदुस्थानची बाजू सरळ घेतली होती व तेव्हा अमेरिका पाकिस्तानला मांडीवर घेऊन बसली होती. सद्दामने अमेरिकेला काय वाटेल याची पर्वा न करता कश्मीरवरील हिंदुस्थानचा दावा मान्य केला होता. मात्र त्याच सद्दामला दहशतवादी ठरवून मारण्यासाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप, फ्रान्ससारखी राष्ट्रे एकत्र आली व त्यांनी इराकवर सैन्य कारवाई केली. मग तोच ‘जोश’ हीच राष्ट्रे आता पाकिस्तान व अजहर मसूदच्या बाबतीत का दाखवत नाहीत? हिंदुस्थानने ‘पुलवामा’चा बदला म्हणून पाकिस्तानवर हल्ला केला तर प्रतिहल्ला करू, आम्ही काही बांगडय़ा भरल्या नाहीत, अशी धमकी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने दिली. यावर बांगडय़ा भरण्यासाठी हात किंवा मनगट लागते. हिंदुस्थानवर शस्त्र्ा उचलण्याआधी तुमचे मनगट शिल्लक राहील काय ते बघा, असे अमेरिका किंवा फ्रान्ससारखी राष्ट्रे ठामपणे पाकिस्तानला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कुणाला सच्चे मित्र वगैरे मानायला तयार नाही. पाकिस्तानला एकटे पाडण्याची कूटनीती वगैरे ठीक आहे, पण एकटा मसूद अजहर हिंदुस्थानला त्रास देतोय. त्याचा कायमचा नाश करा, की मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत त्या कारवाईची वाट पाहायची? सोशल मीडियावरचे युद्ध थांबवून कठोर पावले टाकायला हवीत. अमेरिका-युरोपकडे न पाहता आपले युद्ध आपणच लढण्यात शौर्य आहे. ‘माझेही मन संतापाने पेटले आहे’ असे पंतप्रधान मोदी सांगतात. या पेटलेल्या संतापाचा वणवा पाकिस्तानात भडकलेला दिसू द्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी हे ‘गाली गॅंग’चे अध्यक्ष, भाजपची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

News Desk

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदानाला सुरुवात; द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात कोण मारणार बाजी

Aprna

शरद पवारांनी घेतली राणेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

News Desk