मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकराल्या नंतर राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती केल्या नंतर राज्यात सत्तांतर झालं आणि सत्तासंघर्ष संपन्न झाला. मात्र त्या नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढायाईला सुरुवात झाली. आता खरी शिवसेना नेमकी कोणती हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे. आम्हीच खरी शिवसेना अस शिंदे गटाकडून बोललं जात.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांची खळबळ जनक मुलाखतीचा टीझर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी माध्यमांसमोर येणार आहे मात्र त्या आधी संजय राउत यांनी मुलाखतीचे दोन टीझर ट्विट करत राजकारणात खळबळ उडाऊन दिली आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut ) यांची मुलाखत खासदार संजय राऊत अर्थात सामना चे संपादक घेणार आहे.
भाग:२
खणखणीत मुलाखत!
सामना.
“उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
उद्धव ठाकरे गेलाय अनेक दिवसांपासून अपाली भावना व्यक्त करत आहे आपल्याच लोकांना पाठीत खंजीर खुपसला आल्याची भाषा ते करत आहे. म्हणुन आता या मुलाखतीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नक्की उद्धव ठाकरे काय गोप्यस्पोट करणार याची देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.