HW News Marathi
राजकारण

विरोधकांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव सांगावे !

लातूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. आपल्याकडे पंतप्रधानपदासाठी एकच नाव आहे ना?, परंतु विरोधकांकडे एकाही पंतप्रधान पदाच्या उमेदवारांचे नाव नाही. मग तुम्ही सांगा की, विरोधकांचा पंतप्रधान नक्की आहे तरी कोण? शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव किंवा औवेसी यापैकी पंतप्रधान कोणा ?, असे अनेक सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच मंचावरून विरोधकांवर तोफ डागली आहे. तसेच भाजपच्या जाहीरनाम्याचे समर्थन करत काँग्रेसचा जाहीरनामा हा जुना असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. पुढे उद्धव ठाकरे असे देखील म्हटले की, काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच असल्याचे म्हटले आहे. देशद्रोह्यांवर देशद्रोहाचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे केंद्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर कश्मीरसंदर्भातील ३७० कलम काढणार म्हणजे काढणारच, असेही ते म्हणाले.

मोदी सरकार हे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानने कुरापत काढली. उरी असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल या सरकारने पाकिस्तानला ठोकून दाखवले आहे. पाकिस्तानवर एकदाच घाव घाला, की पाकिस्तानचा नामोनिशाण शिल्लक राहता नये, असा तोडगा काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…लवकरच कळेल किती साखर खाल्ली”, मोहित कंबोजांनी ट्वीट करत रोहित पवारांवर साधला निशाणा

Aprna

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk