नवी दिल्ली | “राहुल गांधींनी हे आता पप्पू राहिलेले नाहीत. तर ते गप्पू झाले आहेत. राहुल गांधींचा पप्पूपासून गप्पूपर्यंतचा हा प्रवास खोटे बोलण्याच्या माध्यमातून सुरु झाला आहे”, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम, तेलंगणा या पाच महत्त्वाच्या राज्यांपैकी विधानसभा निवडणुकांमध्ये तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या दणदणीत विजयाचा भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Union Minister M A Naqvi on Farooq Abdullah's reported comment 'Rahul Gandhi no longer a Pappu': Unhone sahi kaha ki vo ab pappu nahi rahe hain. Ab vo pappu se gappu ban gaye hain, aur pappu se lekar gappu ka unka safar jhuth ka jhunjhuna lekar hua hai, to vo thik keh rahe hain. pic.twitter.com/u10brpMafq
— ANI (@ANI) December 22, 2018
देशातील या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. राहुल गांधींच्या नेत्तृत्त्वाची जाहीरपणे प्रशंसा होऊ लागली. दरम्यान, मुख्तार अब्बास नक्वी यांनी याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींना टोमणा मारला आहे. राहुल गांधी हे पप्पू राहिले नसून ते आता गप्पू झाले आहेत. त्यांचा हा प्रवास खोटे बोलण्याचा माध्यमातून सुरु झाला आहे, अशी टीका मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.