HW Marathi
राजकारण

मोदी सरकार २.० : १०० दिवसात काश्मीरमधील कलम ३७० रद्द, तीन तलाक प्रथा बंद

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील कार्यकाळास आज (८ सप्टेंबर) १०० दिवस पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या १०० दिवसांच्या कामाचा लेखा जोखा घेतला. ‘जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवणे, तीन तलाक प्रथा बंद करणे ही सरकारची महत्त्वाची कामगिरी आहे.’

गेली ७० वर्षे जम्मू-काश्मीर वेगळा पडला होता. मात्र, मोदी सरकारच्या काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता जम्मू-काश्मीर आणि लडाखला सर्व योजनांचे लाभ मिळू लागले आहेत. पाकिस्तानने काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्र संघाचे दरवाजे ठोठावले, मात्र, संपूर्ण जग भारताच्या पाठीशी उभे राहिल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

जावडेकर पुढे म्हणाले, ‘तीन तलाक, पॉक्सो, समान वेतन, ६ कोटी लहान व्यापारी आणि १४ कोटी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याच्या योजनेसारखे महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतले. आयुष्मान भारत, उज्वला गॅस योजनेची व्याप्ती पूर्ण भारतभर वाढवली.’ मोदी सरकारच्या काळात गरीब, मजूर, शेतकरी, आदिवासी सक्षम बनतील असे निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

 

Related posts

कार्यकर्त्यांचा आग्रह, शरद पवार निवडणूक लढविणार का ?

News Desk

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, हिंसाचारमुळे उद्यापासून पश्चिम बंगालमधील प्रचारबंदी

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk