अमेठी | देशात आज (६ मे) पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. यात अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून गंभीर आरोप लावले आहेत. इराणी यांनी ट्वीट अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या ट्वीटमध्ये इराणी यांनी म्हटले की, “आज मी निशब्द झाले आहे. एखादा माणूस इतक्या खालच्या पातळीपर्यंतचे राजकारण करु शकतो, असा विचार कोण कधी केला नसेल. या गरीब रुग्णाकडे मोदी सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड होते. मात्र राहुल गांधी यांच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले नाही.”
आज मैं निशब्द हूँ – कोई इतना गिर सकता है यह कभी नहीं सोचा था।
एक ग़रीब को सिर्फ़ इसलिए मरने दिया क्यूँकि उसके पास मोदी का आयुष्मान कार्ड था पर अस्पताल राहुल गांधी का था। pic.twitter.com/fSqEpK5A6S
— Smriti Z Irani (@smritiirani) May 5, 2019
या प्रकरणामध्ये स्मृती इराणी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही संजय गांधी रुग्णालयाचे ट्रस्टी असल्यामुळे त्या रुग्णावर उपचार झाले नाही. कारण त्यांच्या आयुष्यमान कार्ड असल्यामुळे त्यांच्यावर उपचार झाले नाही. नन्हेलाल मिश्रा (४०) असे या रुग्णाल यांचे नाव आहे. गांधी कुटुंबियी इतके खालची पातळी गाठतील की, एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला. कारण त्यांना त्यांची लोकांच्या जीवापेक्षा राजकारण जास्त प्रिय आहे,” असे आरोप करत राहुल गांधींना अमेठीतील लोकांना याचे उत्तर त्यावे लागेल,” असा सवाल स्मृती इराणी यांनी विचारला आहे.
Smriti Irani: A person died as he was denied treatment at hospital where Rahul Gandhi is trustee,in Amethi just because he had Ayushman Bharat card. Ye parivaar itna ghinona hai ki ek nirdosh ko maut ke ghat utarne ko taiyar hai sirf isliye kyunki unhe apni rajneeti pyari hai pic.twitter.com/DersIyWwxs
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 6, 2019
स्मृती इराणी यांनी केलेला दावा संजय गांधी रुग्णालयात प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे. नन्हेलाल मिश्रा (४०) या रुग्णाला २५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले आहे. मिश्रा यकृत खराब झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. परंतु रुग्णाचे नातेवाईक अरुण कुमार मिश्रा यांनी दावा केला आहे. रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करताना ३ हजार रुपये भरण्यात आले होते. आयुष्यमान कार्डमुळे रुग्णावर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात.
आयुष्यमान कार्ड रुग्णालय कर्मचाऱ्याला दाखवले त्यावर त्यांनी सांगितले की आयुष्यमान कार्ड योगी आणि मोदी यांचे आहे. हे रुग्णालय काँग्रेसचे असल्याने येथे आयुष्यमान कार्ड चालत नाही. त्यानंतर २६ एप्रिलला या रुग्णाचा मृत्यू झाला. अरुण मिश्रा यांनी अमेठीतील भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी हे प्रकरण सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.