HW News Marathi
राजकारण

…तोपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही !

नांदेड |जोपर्यंत मंत्रालयात धनगर समाजाच्या आरक्षणचा मुद्दा घेणार नाही, तोपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही, असे वचन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला दिले आहे. पंकजा यांनी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबाची यात्रेत आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेत असे वक्तव्य केले आहे.

“मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भाजपला आणायचे आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. जोपर्यंत मंत्रालयात धनगर समाजाच्या आरक्षणचा मुदा घेणार नाही, तोपर्यंत मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही. या परिषेदते पंकजा यांच्या व्यतिरिक्त रासपचे प्रमुख महादेव जानकर देखील उपस्थित होते.

तसेच पुढे पंकजा मुंडे असे देखील म्हणाल्या की, “धनगर आरक्षणासाठी दिल्लीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर जाण्याची, तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याची तयारी असल्याचा विश्वास त्यांना यावेळी धनगर समाजाला दिला. धनगर आरक्षणात कोणी आडकाढी आणली तर ही काढी उगारायला मागे-पुढे बघणार नाही,” असे त्या म्हणाल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

swarit

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न किताबाने गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk