हैदराबाद | ‘मी तुम्हाला विश्वास देतो की, तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओवेसींनी निजामासारखे हैदराबाद सोडून पळावे लागेल,’ असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ ओवेसींवर बरसले.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Hyderabad: If BJP comes to power I assure you Owaisi will have to flee from Telangana the same way Nizam was forced to flee from Hyderabad. #TelanganaElections2018 pic.twitter.com/xwdcObSBQQ
— ANI (@ANI) December 2, 2018
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे ( एआयएमआयएम) अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी प्रत्युत्तर देणार आहेत. ओवेसी यांनी त्यांच्या ट्विटरवरुन दिले आहे की, ‘संध्याकाळी ७ ते १० दरम्यान होणाऱ्या सभेतून योगींना उत्तर दिले जाईल,’ असे ट्विट ओवेसींनी केले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस आणि तेलुगू देसम (टीडीपी) हे दोन्ही खिसेकापणाऱ्यांच्या जमातीचे पक्ष असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे.
@CMOfficeUP Mera jawab zaroor suno 7pm se 10pm ke Har jalsa mein https://t.co/hBvGBjBhld
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 2, 2018
याआधी भाजपचे आमदार राजा सिंह यांनी ओवेसींबद्दल वादग्रस्त विधान केले होते की, ‘ओवेसींचे शीर धडावेगळे केल्यावरच मी संतुष्ट होईन,’ असे राजा सिंह यांनी म्हटले होते. याआधी असदुद्दीन ओवेसी यांनी सैदाबादमधील एका सभेत बोलताना भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. ‘मुस्लिमांची धार्मिक स्थळे, मदरसे बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असा आरोप ओवेसी यांनी केला होता. तेलंगणात ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर ११ डिसेंबरला मतमोजणी होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.